rayatecha kaivari

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

रयतेचा वाली 16/01/2021

 पुसद तालुक्यात कोविड—१९ लसीकरणाचा प्रारंभ



पुसद : कोविड १९ च्या पहिल्या लसीचे लसीकरण प्रसंगी उपस्थित मान्यवर.

पुसद/यवतमाळ,ता.१६ : (दै.रयतेचा वाली ता.प्र.वंदना जामगडे) सर्व जग कोविड- १९च्या विळख्यात सापडले असताना  त्यावरील लसीची वाट  जगभर पाहीली जात असताना भारतात या लसीकरणाची सुरुवात ता.१६ जानेवारी पासून झाली आहे. सर्वप्रथम फ्रंट लाईन वर्कर आरोग्य विभागातील कर्मचारी यांना लस देणार असून  पुसद तालुक्यात सुद्धा या लसीकरणाला १६ जानेवारी पासूनच उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद् घाटनाला विधान सभेचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी  इंद्रनील नाईक, उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ  फुपाटे, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते, सर्वप्रथम डॉ. आशिष अविनाश पवार तालुका आरोग्य अधिकारी यांना लस देऊन कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमाचा पुसद तालुक्यात शुभारंभ झाला. लसीकरणाचे महत्त्व  उपस्थितांना सांगून कोविड १९ लसीकरणाला  सुरुवात झाली. यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे  यांनी लस घेतली, यानंतर डॉ. बिरबल पवार, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आरोग्य सहाय्यक प्रमोद इंगळे, उपजिल्हा रुग्णालयाचे औषध निर्माण अधिकारी दिलीप पवार यांना लस देऊन सदर कार्यक्रमास सुरुवात झाली आहे.फ्रंटलाईन वर्कर पैकी शंभर लाभार्थींना लस देण्यात येणार आहे.


५ टिप्पण्या:

  1. मी,पाठवलेली बातमी सर्वांत आधी लावल्याबद्दल धन्यवाद...

    उत्तर द्याहटवा
  2. दै.रयतेचा वाली संपादकीय टीमला धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा

दैनिक रयतेचा कैवारी - शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६

    संपूर्णत: जाहिरातमुक्त आणि निशुल्क असलेले मराठी भाषेतील एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक 'रयतेचा कैवारी' आजच्या प्रेरणादायी बातमीपत्र...